पाणंद फाऊंडेशनतर्फे आज नुतन मराठा महाविद्यालयात रक्तदान शिबीरसंपन्न
आजच्या कोरोनानंतरच्या काळात रक्ताचा तुटवडा असून शासन स्तरावर जनतेला रक्तदानाचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. पाणंद फाऊंडेशन व नुतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचं आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २४ जानेवारी रविवारी सकाळी १० ते २ या वेळेत करण्यात आले. या शिबिरात एकूण 106 माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान केले आहे.
पाणंद फाऊंडेशन ही नुतन मराठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची संस्था आहे. सामाजिक जाणिवेतून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन पाणंद फाऊंडेशनतर्फे वेळोवेळी करण्यात येते. या रक्तदान शिबीराचं उद्घाटन महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रामानंद प्रकाश व नुतन मराठा विद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख, उपायुक्त प्रशांत पाटील, मंत्रालयातील अधिकारी मनीष पाटील, आर पी एफ पोलीस निरीक्षक सी एस पटेल हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते रक्तदान शिबीरासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी भेट दिली. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थापक दिलीप बारी, प्रा सतीश पडलावार पाणंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित तडवी, , शशिकांत फेगडे, ज्ञानेश्वर साळुंखे, अमित पाटील, संतोष उबाळे, गजानन शिंदे, पद्माकर खैरनार, सुनिल बारी,हर्षल पाटील, पंकज नहाले, गिरीश भोसले आदींनी परिश्रम घेतले आहे.