Thursday, June 11, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व औषधी वाटप

कोरोना हा संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून प्रत्येक जन आपापल्या परीने काळजी घेत आहे , पण ज्यांना एक वेळचे जेवणासाठी सुध्दा संघर्ष करावा लागतो असे लोक कोरोना होऊ नये म्हणून काय उपाययोजना करतील ही बाब विचारात घेऊन
पाणंद फाऊंडेशन ने  आज दि 12 जून 2020 रोजी आपल्या पाणंद फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोना हा संसर्गजन्य आजार झोपडपट्टी भागात होऊ नये म्हणून आम्ही जळगाव शहरातील MSEB Office जवळील वस्ती व मेहरून तलाव परिसरातील झोपडपट्टी भागात आर्सेनिक अल्बम 30 ही होमियोपॅथी औषधी व कापडी मास्क वाटून कोरोना वर मात करण्यासाठी चा एक छोटासा प्रयत्न केला.
 सोबत जनजागृती  करतांना संस्थापक - दिलीप बारी,अध्यक्ष - अमित तडवी, सचिव -पंकज नहाले ,खजिनदार - शशिकांत फेगडे, सदस्य - लिलाधर सपकाळे, किशोर सोनवणे, गिरीश भोसले.













Wednesday, June 10, 2020

भागपूर ता. जळगाव येथे कापडी मास्क व औषधी वाटप

 फाऊंडेशन ने भागपूर ता जि जळगाव हे गाव / आदिवासी तांडा ( जळगाव पासुन 16 कि. मी. व उमाळा या गावापासून 4 कि. मी. विमानतळाच्या मागे डोंगरामध्ये असलेले 300 लोकसंख्या असलेले एक छोटेसे गाव) आपण सामाजिक व शैक्षणिक सुदारनेस्तव  दत्तक घेतले होते परंतु हे गाव प्रकल्प ग्रस्त आहे व भविष्यात ह्या गावचे स्तालातरन होत असलेने आपण ह्या कारणास्तव पुढिल कार्य थांबवले होते परंतु ह्या गावातील पोलीस पाटील व ग्रामसेवक व शिक्षक, सरपंच यांचा संपर्कात असून त्या गावाच्या अडचणी सोडविणे बाबत नेहमी आपण अग्रेसर असतो आज दि 11 जून 2020 रोजी आपले पाणंद फाउंडेशन चे कार्यकर्ते आम्ही मिळून कोरोना हा संसर्गजन्य आजार भागपूर या गावी होऊ नये म्हणून आर्सेनिक अल्बम 30 ही होमियोपॅथी औषधी पूर्ण गावात वाटून त्या औषधीचे महत्व व औषधी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करतांना संस्थापक -दिलीप बारी, अध्यक्ष -अमित तडवी, सचिव - पंकज नहाले, खजिनदार - शशिकांत फेगडे