आज दिनांक 28/07/2019 रविवार रोजी पाणंद फाउंडेशन च्या वतीने पाळधी येथे वृक्षारोपण करण्यात आले जी झाडे आपण उन्हाळ्यामध्ये गटारीचे पाणी देवून वाचवली होती त्यातील काही झाडे अगोदरच सुकलेली होती .त्याठिकाणी नवीन वृक्षरोपण करण्यात आले व त्यांना संरक्षण जाळ्या बसविण्यात आल्या या कार्यक्रमाला मार्गदर्शक दिलीप बारी, अध्यक्ष अमित तडवी, सचिव पंकज नहाले , उपाध्यक्ष हर्षल पाटील, सदस्य हेमंत पाटील ,क्रांती कोळी ,स्वप्निल, संजय राजपूत, ज्ञानेश्वर साळुंके, मिलिंद भागेश्वर ,हरिष अस्वार.प्रविण पाटील इत्यादी सदस्य व परिसरातील नागरीकांनी मेहनत घेतली.
Sunday, July 28, 2019
Sunday, July 21, 2019
वृक्षरोपण कार्यक्रम
काल दिनांक 21/07/2019 रविवार रोजी आम्ही कॉलेजच्या मित्रांनी स्थापन केलेल्या पाणंद फौंडेशनच्या माध्यमातून वृक्षरोपणाचा कार्यक्रम गोदावरी कॉलेज च्या मागे भुसावल रोड जळगाव सुधाकर
नगर मधील ओपन प्लेसमध्ये संपन्न झाला 50 झाडे या ठिकाणी लावून त्यांना ट्री
गार्ड लावण्यात आले आणि पाणी देण्यात आले परिसरातील लोकांनी आम्हाला या
उपक्रमासाठी खूप मदत केली व झाडे कायमस्वरूपी टिकवण्याचे आश्वासन दिले अशा
प्रकारे हा उपक्रम यशस्वी रित्या पारपडला.
Sunday, July 14, 2019
" गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा -2019 "
आपण करत असलेल्या उपक्रमांचा कुठे ही वाजागाजा करत नसतांना बारी समाजाने आपल्या पाणंद फाऊंडेशनच्या कार्याची सर्वप्रथम दखल घेत आपल्या ग्रुपचे मार्गदर्शक सदस्य दिलीप बारी यांना बारी समाजाच्या "गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा "-2019 या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व जो मान दिला तो मान फक्त श्री. दिलीप बारी यांचा नसून आपल्या पूर्ण ग्रुपचा आहे. बारी समाजाने पाणंद फाउंडेशनच्या कार्याची दखल घेत श्री. दिलीप बारी यांना पाणंद फाउंडेशन करत असलेल्या कार्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा.श्री.पी.पी.पाटील सर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले व आपल्या ग्रुपचे सदस्य न्यायाधीश मा.श्री.नरेश बारी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सोबत जळगांव शहराचे आमदार श्री राजूमामा भोळे व शहराच्या महापौर सौ.सीमाताई भोळे इ. मान्यवर देखील उपस्थित होते.
हा पाणंद फाऊंडेशनच्या कार्यांचाच गुणगौरव आहे.
हा पाणंद फाऊंडेशनच्या कार्यांचाच गुणगौरव आहे.
Subscribe to:
Posts (Atom)






















