आपण करत असलेल्या उपक्रमांचा कुठे ही वाजागाजा करत नसतांना बारी समाजाने आपल्या पाणंद फाऊंडेशनच्या कार्याची सर्वप्रथम दखल घेत आपल्या ग्रुपचे मार्गदर्शक सदस्य दिलीप बारी यांना बारी समाजाच्या "गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा "-2019 या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व जो मान दिला तो मान फक्त श्री. दिलीप बारी यांचा नसून आपल्या पूर्ण ग्रुपचा आहे. बारी समाजाने पाणंद फाउंडेशनच्या कार्याची दखल घेत श्री. दिलीप बारी यांना पाणंद फाउंडेशन करत असलेल्या कार्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा.श्री.पी.पी.पाटील सर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले व आपल्या ग्रुपचे सदस्य न्यायाधीश मा.श्री.नरेश बारी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सोबत जळगांव शहराचे आमदार श्री राजूमामा भोळे व शहराच्या महापौर सौ.सीमाताई भोळे इ. मान्यवर देखील उपस्थित होते.
हा पाणंद फाऊंडेशनच्या कार्यांचाच गुणगौरव आहे.
हा पाणंद फाऊंडेशनच्या कार्यांचाच गुणगौरव आहे.








No comments:
Post a Comment