भारत, शेतकरी आणि आत्महत्या ! काय आहे हे ? फक्त शब्द की संवेदना? रोजच शेतकरी आत्महत्या करताय सरकार आणि संवेदनशील समाज शक्य ती मदत करताय पण कुठे घोटाळे होताय तर कुठे सावकार कर्ज वसुलीचा तगादा लावून शेतकर्यांना आत्महत्या करायला भाग पडताय . देशाने कितीही प्रगती केली तरी मागासलेलाच राहील जोपर्यंत समाज आपल्या विचारात सुधारणा करत नाही. इतका पैसा येतो पण कुठ जातोय तेच कळत नाही . असो …
आता आपणच सगळ्यांनी मिळून काहीतरी केल पाहिजे . काय करायचं पण? सुरुवात पाणी वाचवण्यापासून करूयात . या पावसाळ्यात शक्य त्या पद्धतीने पाणी वाचवू . प्रत्तेक गावाने तिथल्या पाणी टंचाई वर मात करण्या साठी प्रयत्न करायला हवेत जसे कृत्रिम तळे व पाणवठे ज्यात पावसाळ्यात पाणी साठेल जेणेकरून गावच्या विहिरी व इतर पाण्याच्या स्त्रोताना कायम पाणी राहील व ते टंचाई च्या वेळी वापरता येईल . विहिरी तसेच पाणवठ्यात पाणी असेल तर शेती साठी तसेच पिण्या साठी कायम पाण्याची उपलब्धता राहील. त्याच प्रमाणे जर आपण आपल्या घराच्या छतावर तसेच अंगणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला साठवून शोषखड्डयात यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होईल व परिसरातील विहिरींना कायम पाणी राहील. काही नागरिक नळा ला येणाऱ्या पाण्याने आपली वाहने व अंगणे धुतात त्यांनी हा विचार कायम आपल्या मनात ठेवावा की याच देशात लातूर सारखे प्रदेश ही आहेत जे पाण्याच्या एका थेंबासाठी सुद्धा आसुसलेले आहेत. पाणी अमुल्य आहे. पाणी वाचवायला शिका आणि इतरानाही शिकवा नाहीतर एक दिवस पाणी वाचवायला आपण वाचणार नाहीत हे अटळ सत्य आहे

"जल है तो कल है"

No comments:
Post a Comment