Sunday, September 10, 2017

रविवार चे जेवण आजी - आजोबांसोबत

     असच काहीतरी अचानक पणे एकदम ठरले. जे मित्र कॉलेज लाईफ नंतर आयुष्याची खरी परीक्षा द्यायला आप आपल्या वाटेने निघून गेले, तेच सगळे आज अचानक पणे तब्बल जवळपास दहा वर्षानी एकत्र जमलेत आणि मग काय रविवार रात्रीचे जेवण आजी आजोबांसोबत करण्याचे ठरले, जेवनाचा मेनू ठरला सर्व सोय करुन सायंकाळी जळगांव चे केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम गाठले आणि आजी आजोबांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण पण एकदम खानदेशी पद्धतीचे जे आजी आजोबांना अतिशय आवडले सर्वानी आवड़ीने जेवनाचा आस्वाद घेतला आणि आम्ही सुद्धा. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या सर्व मित्र खुप आनंदी होते. निस्वार्थी पणाने सर्वानी आपआपल्या परिने सर्वतोपरी योगदान दिले.
आता भविष्यात देखील असे उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करत राहू . धन्यवाद ...


































No comments:

Post a Comment