Saturday, May 18, 2019

वृक्ष संजीवनी कार्यक्रम - पाळधी ता. जळगांव

ग्रुप चे सदस्य श्री ज्ञानेश्वर साळुंखे हे कार्यरत असलेले पाळधी  येथिल गिरणा कॉलनी परिसर मध्ये  मागील  वर्षी  50 रोपाणची लागवड केली असून या वर्षी तीव्र पाणी टंचाई मुळे आजू बाजूच्या परिसरातील बोरिंग आटल्याने  व पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्याने त्या रोपांची चिंता आपल्या पाणंद फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केली होती. पाणंद फाउंडेशन चे अध्यक्ष  अमित तडवी, खजिनदार  शशिकांत फेंगडे , सदस्य प्रविण पाटील मार्गदर्शक दिलीप बारी यांनी वेळेच गांभीर्य लक्षात घेता  पुढाकार घेऊन जवळ असलेल्या गटारीचे पाणी अडवून स्वच्छ पाणी उपलब्ध होईल या पद्धतीने जागा करून त्या ठिकाणी पाण्याची मोटार व सर्व रोपानं पर्यंत पुरेल अशी 200 फूट  नळी स्वखर्चाने पाणंद  फाऊंडेशन तर्फे उपलब्ध करून व त्या ठिकाणी दि: 18 मे 2019 रोजी दुपारी 12 ते  2 या वेळेत स्वतः  प्रयोग करून वृक्ष वाचवण्यासाठी चा एक छोटासा यशस्वी प्रयत्न केला व आपले कार्य पाहून प्रभावित होऊन येथील स्थानिक नागरिक श्री ताराचंद यांनी  स्वयंप्रेरणेने कार्यास हातभार लावले. 





1 comment:

  1. खूप छान काम करत आहे पाणंद फौंडेशन... पुढील काळात असेच काम करण्यासाठी शुभेच्छा💐💐

    ReplyDelete