आज दिनांक 10/11/2019
रविवार रोजी दिलीप बारी यांनी वॉट्स अप
ग्रुपच्या मद्यामातून नूतन मराठा कॉलेज
च्या माजी विद्यार्थ्यांचे तिसरे गेट टूगेदर घडवून आणले .60 ते 70 काँलेजच्या
विद्यार्थ्यांनी मित्रांनी व आम्हा
सर्वांचे लाडके व आवडते प्रा. .आदरणीय
श्री पडलवर सर ,आदरणीय श्री
महाडीक सर ,यांनी उपस्थित राहून
कार्यक्रमाची शोभा वाढविली. जिल्हा भारातून नाही तर राज्य भारातून मित्रांनी गेट
टूगेदर ला हजेरी लावली. एवढेच नाहीं तर आमच्या एका मित्राने काश्मीर(कारगिल )वरून
थेट जळगाव गाठले.पद, पैसा, प्रतिष्ठा, बाजूला ठेवून सर्वानी मैत्री ला महत्व दिले.कोणी कमिशनर
आहेत, कुणी मंत्रालयात आहे तर
कुणी फोटोग्राफर सुध्दा आहे .पण हे सर्व घरी विसरून गेट टूगेदर ला फक्त आणि फक्त
मित्र आलेले होते. आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेतून पाणंद
फाऊंडेशनच्या मद्यामातून सामाजिक कार्य आम्ही मित्र करत असतो.16 वर्षे नंतर बरेच मित्र एकमेकांना भेटल्याने
सर्वांना खूप आनंद झाला. शशीकांत फेंगडे सर यांनी कार्यक्रमाचे सर्व नियोजन
केले.सर्वांचा परिचय ,कुठे कार्यरत आहे,एकमेकांची मदत करणे, नंतर जेवणाचा आस्वाद घेऊन शेवटी सर्वांनी आनंद साजरा करत
निरोप घेतला.































No comments:
Post a Comment