Sunday, March 8, 2020

जागतिक महिला दिन कार्यक्रम सन 2020

आज पाणंद फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सफाई कामगार  महिला हे अत्यंत कमी मानधन दरात पुरुष सोबत खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य पार पाडून आपले जळगाव महाराष्ट्र व भारत   स्वच्छ ठेवणाऱ्या अशा महिला ज्या खऱ्या अर्थाने महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यास पात्र ठरतात अशा वंचित घटकास पाणंद फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन निमित्त गुलाब पुष्प व पेढा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आदरणीय  श्री पडलवार सर ,संस्थापक दिलीप बारी ,अध्यक्ष अमित तडवी ,सचिव पंकज नहाले ,खजिनदार शशिकांत फेगडे व सदस्य अमित पाटील, पद्माकर खैरनार, पंकज महाजन, गजानन शिंदे,  ज्ञानेश्वर साळुंके, गिरीश भोसले, श्री सुनिल बारी सर यांनी परिश्रम घेतले




























Tuesday, February 11, 2020

नूतन मराठा महाविद्यालायचे प्राचार्य श्री एल. पी. देशमुख सर यांच्या भेटी प्रसंगाचे काही क्षण

आज नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी स्थापन केलेल्या पाणंद फाउंडेशन च्या माध्यमातून नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एल. पी. देशमुख यांचे पाणंद फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अमित तडवी साहेब व आदरणीय जयप्रकाश महाडिक सर यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक फ्रेम देवून स्वागत करण्यात आले.व पाणंद फाउंडेशन राबवत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती देण्यात आली  पाणंद फाऊंडेशन ने केलेल्या उपक्रमांची एक छोटीशी फाईल तयार करून त्यांना दाखविण्यात आली .

यावेळी पाणंद फाउंडेशन चे मार्गदर्शक -आदरणीय पडलवार सर, आदरणीय महाडिक सर, संस्थापक -दिलीप बारी, अध्यक्ष -अमित तडवी, सचिव -पंकज नहाले, उप- अध्यक्ष हर्षल पाटील, सदस्य - ज्ञानेश्वर साळुंखे,पद्माकर खैरनार, राहूल कासार, सुनील बारी, ईश्वर पाटील, चंद्रकांत चौधरी उपस्थित होते






 

Wednesday, February 5, 2020

श्री प्रदीपभाऊ सोनवणे यांचा वाढदिवस

दि. ०५.०२.२०२० रोजी आपल्या ग्रुप चे सदस्य श्री प्रदीप भाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगांव येथील अनाथाश्रम येथील मुलांसोबत जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला.






Sunday, November 10, 2019

स्नेह सम्मेलन २०१९


आज दिनांक 10/11/2019 रविवार रोजी दिलीप बारी यांनी वॉट्स अप ग्रुपच्या मद्यामातून  नूतन मराठा कॉलेज च्या माजी विद्यार्थ्यांचे तिसरे गेट टूगेदर घडवून आणले .60 ते 70 काँलेजच्या विद्यार्थ्यांनी मित्रांनी व   आम्हा सर्वांचे लाडके व आवडते प्रा. .आदरणीय  श्री पडलवर सर ,आदरणीय श्री महाडीक सर ,यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. जिल्हा भारातून नाही तर राज्य भारातून मित्रांनी गेट टूगेदर ला हजेरी लावली. एवढेच नाहीं तर आमच्या एका मित्राने काश्मीर(कारगिल )वरून थेट जळगाव गाठले.पद, पैसा, प्रतिष्ठा, बाजूला ठेवून सर्वानी मैत्री ला महत्व दिले.कोणी कमिशनर आहेत, कुणी मंत्रालयात आहे तर कुणी फोटोग्राफर सुध्दा आहे .पण हे सर्व घरी विसरून गेट टूगेदर ला फक्त आणि फक्त मित्र आलेले होते. आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेतून पाणंद फाऊंडेशनच्या मद्यामातून सामाजिक कार्य आम्ही मित्र करत असतो.16 वर्षे नंतर बरेच मित्र एकमेकांना भेटल्याने सर्वांना खूप आनंद झाला. शशीकांत फेंगडे सर यांनी कार्यक्रमाचे सर्व नियोजन केले.सर्वांचा परिचय ,कुठे कार्यरत आहे,एकमेकांची मदत करणे, नंतर जेवणाचा आस्वाद घेऊन शेवटी सर्वांनी आनंद साजरा करत निरोप घेतला.