दिनांक २९.१०.२०१७ रोजी " पाचदेवी माता मंदिर, शिरसोली परिसर ता. जळगाव" येथे ग्रुप चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सुरुवातीला प्रत्तेकाने आपला परिचय करून दिला सोबत भोजनाचा कार्यक्रम हि पार पडला. सदरील कार्यक्रमात काही सामाजिक उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली त्याला सर्व मित्रांनी चांगलाच प्रतिसाद देत आपापल्या विचारांचे देवाणघेवाण केले. सर्व मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे प्रत्येकाने संबंधित नियोजित कामांसाठी आपापल्या परीने सहयोग देण्याची तयारी दर्शवली.
Sunday, October 29, 2017
Sunday, September 10, 2017
रविवार चे जेवण आजी - आजोबांसोबत
असच काहीतरी अचानक पणे एकदम ठरले. जे मित्र कॉलेज लाईफ नंतर आयुष्याची खरी
परीक्षा द्यायला आप आपल्या वाटेने निघून गेले, तेच सगळे आज अचानक पणे तब्बल
जवळपास दहा वर्षानी एकत्र जमलेत आणि मग काय रविवार रात्रीचे जेवण आजी
आजोबांसोबत करण्याचे ठरले, जेवनाचा मेनू ठरला सर्व सोय करुन सायंकाळी
जळगांव चे केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम गाठले आणि आजी आजोबांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण पण एकदम
खानदेशी पद्धतीचे जे आजी आजोबांना अतिशय आवडले सर्वानी आवड़ीने जेवनाचा
आस्वाद घेतला आणि आम्ही सुद्धा. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या सर्व मित्र
खुप आनंदी होते. निस्वार्थी पणाने सर्वानी आपआपल्या परिने सर्वतोपरी योगदान दिले.
आता भविष्यात देखील असे उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करत राहू . धन्यवाद ...
आता भविष्यात देखील असे उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करत राहू . धन्यवाद ...
Sunday, November 27, 2016
Subscribe to:
Posts (Atom)
















































