Sunday, January 24, 2021

पाणंद फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबीर

 पाणंद फाऊंडेशनतर्फे आज  नुतन मराठा महाविद्यालयात रक्तदान शिबीरसंपन्न



आजच्या कोरोनानंतरच्या काळात रक्ताचा तुटवडा असून शासन स्तरावर जनतेला रक्तदानाचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. पाणंद फाऊंडेशन व नुतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचं आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २४ जानेवारी रविवारी सकाळी १० ते २ या वेळेत करण्यात आले. या  शिबिरात एकूण 106  माजी  विद्यार्थ्यांनी  रक्तदान केले  आहे.

 पाणंद फाऊंडेशन ही  नुतन मराठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची संस्था आहे. सामाजिक जाणिवेतून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन पाणंद फाऊंडेशनतर्फे वेळोवेळी करण्यात येते. या रक्तदान शिबीराचं उद्घाटन महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रामानंद प्रकाश              व  नुतन मराठा विद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख, उपायुक्त प्रशांत  पाटील, मंत्रालयातील अधिकारी  मनीष पाटील, आर पी एफ पोलीस निरीक्षक सी एस पटेल   हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते  रक्तदान शिबीरासाठी अनेक  माजी   विद्यार्थ्यांनी भेट  दिली. सदर शिबीर  यशस्वी  करण्यासाठी  संस्थापक दिलीप  बारी, प्रा सतीश पडलावार पाणंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित तडवी, , शशिकांत फेगडे, ज्ञानेश्वर साळुंखे, अमित  पाटील, संतोष उबाळे, गजानन शिंदे, पद्माकर खैरनार, सुनिल बारी,हर्षल पाटील, पंकज नहाले, गिरीश भोसले आदींनी परिश्रम घेतले  आहे.














Thursday, June 11, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व औषधी वाटप

कोरोना हा संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून प्रत्येक जन आपापल्या परीने काळजी घेत आहे , पण ज्यांना एक वेळचे जेवणासाठी सुध्दा संघर्ष करावा लागतो असे लोक कोरोना होऊ नये म्हणून काय उपाययोजना करतील ही बाब विचारात घेऊन
पाणंद फाऊंडेशन ने  आज दि 12 जून 2020 रोजी आपल्या पाणंद फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोना हा संसर्गजन्य आजार झोपडपट्टी भागात होऊ नये म्हणून आम्ही जळगाव शहरातील MSEB Office जवळील वस्ती व मेहरून तलाव परिसरातील झोपडपट्टी भागात आर्सेनिक अल्बम 30 ही होमियोपॅथी औषधी व कापडी मास्क वाटून कोरोना वर मात करण्यासाठी चा एक छोटासा प्रयत्न केला.
 सोबत जनजागृती  करतांना संस्थापक - दिलीप बारी,अध्यक्ष - अमित तडवी, सचिव -पंकज नहाले ,खजिनदार - शशिकांत फेगडे, सदस्य - लिलाधर सपकाळे, किशोर सोनवणे, गिरीश भोसले.













Wednesday, June 10, 2020

भागपूर ता. जळगाव येथे कापडी मास्क व औषधी वाटप

 फाऊंडेशन ने भागपूर ता जि जळगाव हे गाव / आदिवासी तांडा ( जळगाव पासुन 16 कि. मी. व उमाळा या गावापासून 4 कि. मी. विमानतळाच्या मागे डोंगरामध्ये असलेले 300 लोकसंख्या असलेले एक छोटेसे गाव) आपण सामाजिक व शैक्षणिक सुदारनेस्तव  दत्तक घेतले होते परंतु हे गाव प्रकल्प ग्रस्त आहे व भविष्यात ह्या गावचे स्तालातरन होत असलेने आपण ह्या कारणास्तव पुढिल कार्य थांबवले होते परंतु ह्या गावातील पोलीस पाटील व ग्रामसेवक व शिक्षक, सरपंच यांचा संपर्कात असून त्या गावाच्या अडचणी सोडविणे बाबत नेहमी आपण अग्रेसर असतो आज दि 11 जून 2020 रोजी आपले पाणंद फाउंडेशन चे कार्यकर्ते आम्ही मिळून कोरोना हा संसर्गजन्य आजार भागपूर या गावी होऊ नये म्हणून आर्सेनिक अल्बम 30 ही होमियोपॅथी औषधी पूर्ण गावात वाटून त्या औषधीचे महत्व व औषधी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करतांना संस्थापक -दिलीप बारी, अध्यक्ष -अमित तडवी, सचिव - पंकज नहाले, खजिनदार - शशिकांत फेगडे









Sunday, March 8, 2020

जागतिक महिला दिन कार्यक्रम सन 2020

आज पाणंद फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सफाई कामगार  महिला हे अत्यंत कमी मानधन दरात पुरुष सोबत खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य पार पाडून आपले जळगाव महाराष्ट्र व भारत   स्वच्छ ठेवणाऱ्या अशा महिला ज्या खऱ्या अर्थाने महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यास पात्र ठरतात अशा वंचित घटकास पाणंद फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन निमित्त गुलाब पुष्प व पेढा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आदरणीय  श्री पडलवार सर ,संस्थापक दिलीप बारी ,अध्यक्ष अमित तडवी ,सचिव पंकज नहाले ,खजिनदार शशिकांत फेगडे व सदस्य अमित पाटील, पद्माकर खैरनार, पंकज महाजन, गजानन शिंदे,  ज्ञानेश्वर साळुंके, गिरीश भोसले, श्री सुनिल बारी सर यांनी परिश्रम घेतले