Sunday, September 10, 2017

रविवार चे जेवण आजी - आजोबांसोबत

     असच काहीतरी अचानक पणे एकदम ठरले. जे मित्र कॉलेज लाईफ नंतर आयुष्याची खरी परीक्षा द्यायला आप आपल्या वाटेने निघून गेले, तेच सगळे आज अचानक पणे तब्बल जवळपास दहा वर्षानी एकत्र जमलेत आणि मग काय रविवार रात्रीचे जेवण आजी आजोबांसोबत करण्याचे ठरले, जेवनाचा मेनू ठरला सर्व सोय करुन सायंकाळी जळगांव चे केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम गाठले आणि आजी आजोबांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण पण एकदम खानदेशी पद्धतीचे जे आजी आजोबांना अतिशय आवडले सर्वानी आवड़ीने जेवनाचा आस्वाद घेतला आणि आम्ही सुद्धा. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या सर्व मित्र खुप आनंदी होते. निस्वार्थी पणाने सर्वानी आपआपल्या परिने सर्वतोपरी योगदान दिले.
आता भविष्यात देखील असे उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करत राहू . धन्यवाद ...


































Sunday, November 27, 2016

ग्रुप चे सदस्य धीरज मिहीरे यांच्या वाढ दिवसानिमित्त कंबल वाटप

दि. २६/११/२०१६ रोजी आपल्या ग्रुप चे सदस्य श्री धीरज मिहीरे यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वे स्टेशन जळगाव येथे गरजू तसेच वयोवृद्धासाठी  कंबल वाटप करण्यात आले .







Thursday, April 28, 2016

वाचवाल तर वाचाल

भारत, शेतकरी आणि आत्महत्या ! काय आहे हे ? फक्त शब्द की संवेदना?  रोजच शेतकरी आत्महत्या करताय सरकार आणि  संवेदनशील  समाज  शक्य ती मदत करताय पण  कुठे घोटाळे होताय तर कुठे सावकार कर्ज वसुलीचा तगादा लावून शेतकर्यांना आत्महत्या करायला भाग पडताय . देशाने कितीही प्रगती केली तरी मागासलेलाच राहील जोपर्यंत समाज आपल्या विचारात सुधारणा करत नाही. इतका पैसा येतो पण कुठ जातोय तेच कळत नाही . असो …
आता आपणच सगळ्यांनी मिळून काहीतरी केल पाहिजे . काय करायचं पण? सुरुवात पाणी वाचवण्यापासून करूयात . या पावसाळ्यात शक्य त्या पद्धतीने पाणी वाचवू . प्रत्तेक गावाने तिथल्या पाणी टंचाई वर मात करण्या साठी प्रयत्न करायला हवेत जसे कृत्रिम तळे व पाणवठे ज्यात पावसाळ्यात पाणी साठेल जेणेकरून गावच्या विहिरी व इतर पाण्याच्या स्त्रोताना कायम पाणी राहील व ते टंचाई  च्या वेळी वापरता येईल . विहिरी तसेच पाणवठ्यात पाणी असेल तर शेती साठी तसेच पिण्या साठी कायम पाण्याची उपलब्धता राहील.   त्याच प्रमाणे जर आपण आपल्या घराच्या छतावर तसेच अंगणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला साठवून शोषखड्डयात यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होईल व परिसरातील विहिरींना कायम पाणी राहील. काही नागरिक नळा ला येणाऱ्या पाण्याने आपली वाहने व अंगणे धुतात त्यांनी हा विचार कायम आपल्या मनात ठेवावा की याच देशात लातूर सारखे प्रदेश ही आहेत जे पाण्याच्या एका थेंबासाठी सुद्धा आसुसलेले आहेत. पाणी अमुल्य आहे. पाणी वाचवायला शिका आणि इतरानाही शिकवा नाहीतर एक दिवस पाणी वाचवायला आपण वाचणार नाहीत हे अटळ सत्य आहे 

"जल है तो कल है"

प्रथम स्नेह मेळावा स्थळ पाच देवी मंदिर शिरसोली (दि. २८.०४.२०१६ )

श्री दिलीप बारी यांनी 31/08/2015 रोजी एक व्हाट्सएप  ग्रुप तयार करून व्हाट्सएपच्यामाध्यमातून सर्व मीत्रांना एकत्र आनले व दिनांक 28/04/2016 रोजी ग्रुपचे पहिले गेटटुगेदर घडवून आणले सर्व मित्र एकत्र आल्यानंतर एकमेकांना वेगवेगळ्या आकारमानात बघून हसू आलं सर्वांना एकमेकांना भेटून गहिवरल्या सारखे झाले.जेवनाचा बेत होताच शेवटी अस्सल जळगावकर म्हटल्यावर वरण बट्टी शिवाय मेनू असूच शकत नाही.सर्वांनी वरण बट्टी चा आस्वाद घेतला नंतर वेळ आली अलिप्त होण्याची.सर्वांना बारा वर्षानंतर भेटल्याने खूप आनंद झाला होता.



Tuesday, April 19, 2016

एक प्रयत्न शेतकरी राजासाठी

कर्जबाजारी शेतकर्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी कार्य करणाऱ्या " नाम फाउंडेशन " ला आमच्या ग्रुप कडून छोटीशी मदत .