फाऊंडेशन ने भागपूर ता जि जळगाव हे गाव / आदिवासी तांडा ( जळगाव पासुन 16 कि. मी. व उमाळा या गावापासून 4 कि. मी. विमानतळाच्या मागे डोंगरामध्ये असलेले 300 लोकसंख्या असलेले एक छोटेसे गाव) आपण सामाजिक व शैक्षणिक सुदारनेस्तव दत्तक घेतले होते परंतु हे गाव प्रकल्प ग्रस्त आहे व भविष्यात ह्या गावचे स्तालातरन होत असलेने आपण ह्या कारणास्तव पुढिल कार्य थांबवले होते परंतु ह्या गावातील पोलीस पाटील व ग्रामसेवक व शिक्षक, सरपंच यांचा संपर्कात असून त्या गावाच्या अडचणी सोडविणे बाबत नेहमी आपण अग्रेसर असतो आज दि 11 जून 2020 रोजी आपले पाणंद फाउंडेशन चे कार्यकर्ते आम्ही मिळून कोरोना हा संसर्गजन्य आजार भागपूर या गावी होऊ नये म्हणून आर्सेनिक अल्बम 30 ही होमियोपॅथी औषधी पूर्ण गावात वाटून त्या औषधीचे महत्व व औषधी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करतांना संस्थापक -दिलीप बारी, अध्यक्ष -अमित तडवी, सचिव - पंकज नहाले, खजिनदार - शशिकांत फेगडे
Wednesday, June 10, 2020
Sunday, March 8, 2020
जागतिक महिला दिन कार्यक्रम सन 2020
आज पाणंद फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सफाई कामगार महिला हे अत्यंत कमी मानधन दरात पुरुष सोबत खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य पार पाडून आपले जळगाव महाराष्ट्र व भारत स्वच्छ ठेवणाऱ्या अशा महिला ज्या खऱ्या अर्थाने महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यास पात्र ठरतात अशा वंचित घटकास पाणंद फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन निमित्त गुलाब पुष्प व पेढा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आदरणीय श्री पडलवार सर ,संस्थापक दिलीप बारी ,अध्यक्ष अमित तडवी ,सचिव पंकज नहाले ,खजिनदार शशिकांत फेगडे व सदस्य अमित पाटील, पद्माकर खैरनार, पंकज महाजन, गजानन शिंदे, ज्ञानेश्वर साळुंके, गिरीश भोसले, श्री सुनिल बारी सर यांनी परिश्रम घेतले
Tuesday, February 11, 2020
नूतन मराठा महाविद्यालायचे प्राचार्य श्री एल. पी. देशमुख सर यांच्या भेटी प्रसंगाचे काही क्षण
आज नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी स्थापन केलेल्या पाणंद फाउंडेशन च्या माध्यमातून नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एल. पी. देशमुख यांचे पाणंद फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अमित तडवी साहेब व आदरणीय जयप्रकाश महाडिक सर यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक फ्रेम देवून स्वागत करण्यात आले.व पाणंद फाउंडेशन राबवत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती देण्यात आली पाणंद फाऊंडेशन ने केलेल्या उपक्रमांची एक छोटीशी फाईल तयार करून त्यांना दाखविण्यात आली .
यावेळी पाणंद फाउंडेशन चे मार्गदर्शक -आदरणीय पडलवार सर, आदरणीय महाडिक सर, संस्थापक -दिलीप बारी, अध्यक्ष -अमित तडवी, सचिव -पंकज नहाले, उप- अध्यक्ष हर्षल पाटील, सदस्य - ज्ञानेश्वर साळुंखे,पद्माकर खैरनार, राहूल कासार, सुनील बारी, ईश्वर पाटील, चंद्रकांत चौधरी उपस्थित होते
यावेळी पाणंद फाउंडेशन चे मार्गदर्शक -आदरणीय पडलवार सर, आदरणीय महाडिक सर, संस्थापक -दिलीप बारी, अध्यक्ष -अमित तडवी, सचिव -पंकज नहाले, उप- अध्यक्ष हर्षल पाटील, सदस्य - ज्ञानेश्वर साळुंखे,पद्माकर खैरनार, राहूल कासार, सुनील बारी, ईश्वर पाटील, चंद्रकांत चौधरी उपस्थित होते
Wednesday, February 5, 2020
Sunday, November 10, 2019
स्नेह सम्मेलन २०१९
आज दिनांक 10/11/2019
रविवार रोजी दिलीप बारी यांनी वॉट्स अप
ग्रुपच्या मद्यामातून नूतन मराठा कॉलेज
च्या माजी विद्यार्थ्यांचे तिसरे गेट टूगेदर घडवून आणले .60 ते 70 काँलेजच्या
विद्यार्थ्यांनी मित्रांनी व आम्हा
सर्वांचे लाडके व आवडते प्रा. .आदरणीय
श्री पडलवर सर ,आदरणीय श्री
महाडीक सर ,यांनी उपस्थित राहून
कार्यक्रमाची शोभा वाढविली. जिल्हा भारातून नाही तर राज्य भारातून मित्रांनी गेट
टूगेदर ला हजेरी लावली. एवढेच नाहीं तर आमच्या एका मित्राने काश्मीर(कारगिल )वरून
थेट जळगाव गाठले.पद, पैसा, प्रतिष्ठा, बाजूला ठेवून सर्वानी मैत्री ला महत्व दिले.कोणी कमिशनर
आहेत, कुणी मंत्रालयात आहे तर
कुणी फोटोग्राफर सुध्दा आहे .पण हे सर्व घरी विसरून गेट टूगेदर ला फक्त आणि फक्त
मित्र आलेले होते. आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेतून पाणंद
फाऊंडेशनच्या मद्यामातून सामाजिक कार्य आम्ही मित्र करत असतो.16 वर्षे नंतर बरेच मित्र एकमेकांना भेटल्याने
सर्वांना खूप आनंद झाला. शशीकांत फेंगडे सर यांनी कार्यक्रमाचे सर्व नियोजन
केले.सर्वांचा परिचय ,कुठे कार्यरत आहे,एकमेकांची मदत करणे, नंतर जेवणाचा आस्वाद घेऊन शेवटी सर्वांनी आनंद साजरा करत
निरोप घेतला.
Subscribe to:
Posts (Atom)












































































