Saturday, June 15, 2019
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Saturday, May 18, 2019
वृक्ष संजीवनी कार्यक्रम - पाळधी ता. जळगांव
ग्रुप चे सदस्य श्री ज्ञानेश्वर साळुंखे हे कार्यरत असलेले पाळधी येथिल गिरणा कॉलनी परिसर मध्ये मागील वर्षी 50 रोपाणची लागवड केली असून या वर्षी तीव्र पाणी टंचाई मुळे आजू बाजूच्या परिसरातील बोरिंग आटल्याने व पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्याने त्या रोपांची चिंता आपल्या पाणंद फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केली होती. पाणंद फाउंडेशन चे अध्यक्ष अमित तडवी, खजिनदार शशिकांत फेंगडे , सदस्य प्रविण पाटील मार्गदर्शक दिलीप बारी यांनी वेळेच गांभीर्य लक्षात घेता पुढाकार घेऊन जवळ असलेल्या गटारीचे पाणी अडवून स्वच्छ पाणी उपलब्ध होईल या पद्धतीने जागा करून त्या ठिकाणी पाण्याची मोटार व सर्व रोपानं पर्यंत पुरेल अशी 200 फूट नळी स्वखर्चाने पाणंद फाऊंडेशन तर्फे उपलब्ध करून व त्या ठिकाणी दि: 18 मे 2019 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्वतः प्रयोग करून वृक्ष वाचवण्यासाठी चा एक छोटासा यशस्वी प्रयत्न केला व आपले कार्य पाहून प्रभावित होऊन येथील स्थानिक नागरिक श्री ताराचंद यांनी स्वयंप्रेरणेने कार्यास हातभार लावले.
Friday, December 7, 2018
Thursday, November 2, 2017
श्री. दिलीप भाऊ बारी - वाढदिवस अभिष्ठचिंतन
आयुष्यात आपल्या सुखदुःखामध्ये अग्रणी असलेला मिञ प्रत्येकाला लाभत असतो असेच आमचे लाडके मिञ दिलीप बारी. चेहऱ्यावर नेहमीच हसु असणारे व सर्वांशी मनमोकळेपणे बोलणारे दिलीप. सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. विद्यार्थी दशे नंतर प्रत्येकजण उपजिविकेसाठी एकमेकांपासून लांब. अशात आपले लाडके दिलीप भाऊ यांनी whatsapp च्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणले. त्यांचा आज वाढदिवस. वाढदिवस आपण कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या सोबत तर नेहमीच साजरा करत असतो परंतु यावेळी एखाद्या अनाथाश्रमात तेथील मुलांसोबत साजरा करण्यात आला. त्यांनीही जो आपलेपणा अनुभवला व आम्हा सर्व मित्रांना दिला त्याचा आनंद हा मौल्यवान आहे जो विकत घेतला जाऊ शकत नाही. अशा पारसरुपी आमच्या परमप्रिय मिञांला वाढदिवासांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा -
HAAPY BIRTHDAY DILIP BHAI
Sunday, October 29, 2017
वाषिर्क स्नेहसंमेलन
दिनांक २९.१०.२०१७ रोजी " पाचदेवी माता मंदिर, शिरसोली परिसर ता. जळगाव" येथे ग्रुप चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सुरुवातीला प्रत्तेकाने आपला परिचय करून दिला सोबत भोजनाचा कार्यक्रम हि पार पडला. सदरील कार्यक्रमात काही सामाजिक उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली त्याला सर्व मित्रांनी चांगलाच प्रतिसाद देत आपापल्या विचारांचे देवाणघेवाण केले. सर्व मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे प्रत्येकाने संबंधित नियोजित कामांसाठी आपापल्या परीने सहयोग देण्याची तयारी दर्शवली.
Subscribe to:
Posts (Atom)



















































