Sunday, July 14, 2019

" गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा -2019 "

आपण करत असलेल्या उपक्रमांचा कुठे ही वाजागाजा करत नसतांना बारी समाजाने आपल्या पाणंद फाऊंडेशनच्या कार्याची सर्वप्रथम दखल घेत आपल्या ग्रुपचे मार्गदर्शक सदस्य दिलीप बारी यांना बारी समाजाच्या "गुणी विद्यार्थ्यांचा  गुणगौरव सोहळा "-2019  या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व जो मान दिला तो मान फक्त श्री. दिलीप बारी यांचा नसून आपल्या पूर्ण ग्रुपचा आहे. बारी समाजाने पाणंद  फाउंडेशनच्या कार्याची दखल घेत श्री. दिलीप बारी यांना पाणंद फाउंडेशन करत असलेल्या कार्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा.श्री.पी.पी.पाटील सर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले व आपल्या ग्रुपचे सदस्य न्यायाधीश मा.श्री.नरेश बारी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते  सोबत  जळगांव शहराचे आमदार श्री राजूमामा भोळे व शहराच्या महापौर सौ.सीमाताई भोळे इ. मान्यवर  देखील उपस्थित होते.
हा पाणंद  फाऊंडेशनच्या कार्यांचाच गुणगौरव आहे.








Saturday, June 15, 2019

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

दिनांक 15/06/2019 रोजी आम्ही काँलेज च्या मित्रांनी स्थापन केलेल्या पाणंद फाऊंडेशन तर्फे जळगाव जिल्ह्यातील उमाळा या गावाजवळील चार कि.मी.अंतरावर डोंगरामध्ये असलेल्या भागपूर या पुर्ण भिल्ल वस्ती असलेल्या छोट्याशा गावात तेथील लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून 2000 लीटर पाण्याची टाकी बसवण्यात आली व पाणंद फाऊंडेशन चे सचिव पंकज नहाले यांचा मुलगा तेजस याच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने भागपूर येथील पहिली ते चौथी पर्यंत च्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.












Saturday, May 18, 2019

वृक्ष संजीवनी कार्यक्रम - पाळधी ता. जळगांव

ग्रुप चे सदस्य श्री ज्ञानेश्वर साळुंखे हे कार्यरत असलेले पाळधी  येथिल गिरणा कॉलनी परिसर मध्ये  मागील  वर्षी  50 रोपाणची लागवड केली असून या वर्षी तीव्र पाणी टंचाई मुळे आजू बाजूच्या परिसरातील बोरिंग आटल्याने  व पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्याने त्या रोपांची चिंता आपल्या पाणंद फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केली होती. पाणंद फाउंडेशन चे अध्यक्ष  अमित तडवी, खजिनदार  शशिकांत फेंगडे , सदस्य प्रविण पाटील मार्गदर्शक दिलीप बारी यांनी वेळेच गांभीर्य लक्षात घेता  पुढाकार घेऊन जवळ असलेल्या गटारीचे पाणी अडवून स्वच्छ पाणी उपलब्ध होईल या पद्धतीने जागा करून त्या ठिकाणी पाण्याची मोटार व सर्व रोपानं पर्यंत पुरेल अशी 200 फूट  नळी स्वखर्चाने पाणंद  फाऊंडेशन तर्फे उपलब्ध करून व त्या ठिकाणी दि: 18 मे 2019 रोजी दुपारी 12 ते  2 या वेळेत स्वतः  प्रयोग करून वृक्ष वाचवण्यासाठी चा एक छोटासा यशस्वी प्रयत्न केला व आपले कार्य पाहून प्रभावित होऊन येथील स्थानिक नागरिक श्री ताराचंद यांनी  स्वयंप्रेरणेने कार्यास हातभार लावले. 





Friday, December 7, 2018

सिव्हिल हाँस्पिटल जळगाव येथे महिलांना फळे वाटप

07/12/2018 रोजी पंकज भाऊ नहाले यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हाँस्पिटल जळगाव मध्ये डिलिव्हरी वार्डात महिलांना फळे वाटप करण्यात आले .




Thursday, November 2, 2017

श्री. दिलीप भाऊ बारी - वाढदिवस अभिष्ठचिंतन

आयुष्यात आपल्या सुखदुःखामध्ये अग्रणी असलेला मिञ प्रत्येकाला लाभत असतो असेच आमचे लाडके  मिञ  दिलीप बारी. चेहऱ्यावर नेहमीच हसु असणारे  व सर्वांशी मनमोकळेपणे बोलणारे दिलीप.  सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. विद्यार्थी दशे नंतर  प्रत्येकजण उपजिविकेसाठी  एकमेकांपासून लांब. अशात आपले लाडके दिलीप भाऊ यांनी whatsapp च्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणले. त्यांचा आज वाढदिवस. वाढदिवस आपण कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या सोबत तर नेहमीच साजरा करत असतो परंतु यावेळी एखाद्या अनाथाश्रमात तेथील मुलांसोबत साजरा करण्यात आला. त्यांनीही जो आपलेपणा अनुभवला व आम्हा सर्व मित्रांना दिला त्याचा आनंद हा मौल्यवान आहे जो विकत घेतला जाऊ शकत नाही.     अशा पारसरुपी आमच्या परमप्रिय मिञांला वाढदिवासांच्या  हार्दिक  हार्दिक  शुभेच्छा -

HAAPY BIRTHDAY DILIP BHAI